Police intervene as a woman attempts self-immolation outside the Amravati Collector Office on Republic Day. Saam Tv
Video

प्रजासत्ताक दिनी धक्कादायक प्रकार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न|VIDEO

Woman Attempts Self Immolation Over job Scam In Amravati: नोकरीचे आमिष दाखवून 4 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.

Omkar Sonawane

आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका धुनी भांडी करणाऱ्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र गाडगे नगर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. उषा गोंडाने असे संबंधित महिलेचे नाव असून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. नोकरीचे आमिष देतो असे सांगून चार लाख 65 हजार रुपये एवढी रक्कम ठाकुर कुटुंबीयांनी माझ्याकडून घेतली. मी हे सर्व पैसे भांडी करून गोळा केले.

मात्र अजून पर्यंत नोकरी मिळाली नाही आणि माझे पैसे मिळाले नाही. त्यामुळे मी आतपर्यंतचा निर्णय घेतला होता असा आरोप यावेळी महिलेनी केला. घटनेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेतून आत्मदहनाचा इशाराही दिला होता. प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित महिलेला पुढील चौकशीसाठी फ्रेजरपूरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात घंटाळी मैदान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण

Tuesday Horoscope: मनावरचा ताण अन् खर्च वाढेल, 5 राशींना आर्थिक चणचण भासेल; वाचा मंगळवार राशीभविष्य

आदिवासींच्या मागण्यांसाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयाल घालणार घेराव|VIDEO

Evening Snack Recipe : संध्याकाळी नाश्त्याला बनवा चटपटीत 5 पदार्थ

Long Mangalsutra Design: लग्नसराई किंवा फंक्शनसाठी ट्राय करा 'हे' ट्रेडिंग सुंदर मोठे मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT