will bjp shinde sena alliance break over thane mayor  saam tv
Video

Mayor Post : महापौरपदावरून भाजप-शिंदेसेना युती तुटणार? VIDEO

Thane Mayor Post : ठाण्याच्या महापौरपदावरून भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यात आम्हाला महापौरपद देण्यात यावं, अशी मागणी भाजप नेत्यानं केलीय. तर शिंदे आणि फडणवीस जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदेसेना खासदार म्हस्के म्हणाले.

Nandkumar Joshi

मुंबईत महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असताना, ठाण्यातही महापौरपदावरून भाजप - शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्याचं महापौरपद हे भाजपला देण्यात यावं, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. महत्वाची पदे मिळाली नाहीत, तर विरोधी बाकावर बसू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आमचा स्ट्राइक रेट १०० टक्के राहिला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. आमच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करायचे असतील तर, महापालिकेत महत्वाची पदे आहेत, ती गरजेची आहेत. महापौरपद, सभागृह नेता, स्थायी समिती या सगळ्यांमध्ये पदे मिळावीत, अशी मागणी डावखरे यांनी केली.

प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आमचा महापौर असावा. त्यामुळे भाजप नेत्यांना वाटत असेल. तर त्यात चूक काय आहे. आम्हालाही वाटतं की सर्व ठिकाणी आमचा महापौर असावा. पण ते शक्य आहे का? शेवटी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येवर महापौर ठरतो. तसेच पक्षाचे नेते आहेत ते निर्णय घेतात त्यावर महापौर ठरतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठामपणे मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मादुरोंनंतर आता खोमेनींचं अपहरण करणार? इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार?

Tuesday Horoscope : घराचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

Konkan Politics: ऐन झेडपीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; धडाधड ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT