Local authorities and citizens assist injured passengers after the ST bus collided with a trailer at Dhotra Crossroads near Wardha.  Saam Tv
Video

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Maharashtra Highway Accident: वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्त्यावर एस.टी. बस आणि ट्रेलरची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत १० ते १२ प्रवासी जखमी झाले असून, चालकाची प्रकृती गंभीर आहे.

Omkar Sonawane

वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येथे शनिवारी सकाळच्या सुमारास एस. टी. बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या धडकेत बस चालक गंभीर जखमी झाला असून, एकूण १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धेहून हिंगणघाटकडे जाणारी एस. टी. बस धोत्रा चौरस्त्यावर येत असताना, पेट्रोलपंपावरून डिझेल भरून निघालेल्या ट्रेलरने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो रस्ता न पाहता अचानकपणे ओलांडत असल्याने बसची ट्रेलरला जोरदार धडक बसली. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून, इतर जखमी प्रवाशांना पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, अल्लीपूर पोलीस निरीक्षक विजय घुले यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करण्याची कार्यवाही केली. स्थानिक पातळीवर अपघाताच्या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

SCROLL FOR NEXT