Violence erupts in Gevrai as a mob pelts stones at former MLA Laxman Pawar’s residence; vehicles vandalised and heavy police force deployed. Saam Tv
Video

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Beed Municipal Election Violence: बीडच्या गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक झाली असून जमावाने वाहनांची तोडफोड केली.

Omkar Sonawane

राज्यामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. अनेक दिग्गज नेत्यांची आज प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असून पवार गट आणि पंडित गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादातून परिस्थिती हाताबाहेर गेली आणि रस्त्यावर अक्षरशः धुमश्चक्रीचे चित्र पाहायला मिळाले. तणाव वाढताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हिंसक जमावाकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये मेंढपाळ आक्रमक

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Purnima Birth: पौर्णिमेला जन्मलेले मुलं कशी असतात?

मुंबईकरांसाठी हक्काचं घर, मोफत बससेवा अन् 100 युनिटपर्यंत वीज, ठाकरेंचं आश्वासन|VIDEO

SCROLL FOR NEXT