Leopard Spotted In Ashti Taluka: बीड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Viral Video Of Leopard Jumping On Vehicles: बीडच्या आष्टी आणि गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी परिसरात काल रात्री बिबट्या मुक्त संचार करत असतांना तसेच येणाऱ्या वाहनांवर झेप घेतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. तर गेवराई तालुक्यातील राक्षस भवन तळणेवाडी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. तालुक्यातील नागरिक भयभीत झाले असून वनविभाने तात्काळ या परिसरात पिंजरा बसवून हा बिबट्या पकडण्यात यावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. बावी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी राजू गोल्हार यांचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या पकडावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com