Vidhan Bhavan Saam TV
Video

Vidhan Bhavan : विधान भवनातील राड्यानंतर कडक निर्णय, फक्त विशेष परवानगीच चालणार | VIDEO

No Entry Without Special Pass : विधान भवन सुरक्षा कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आज विधान भवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना विधान भवनमध्ये येण्यास परवानगी नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या गोंधळानतर आज विधान भवनाच्या कामकाजावर त्याचे स्पष्ट पडसाद पाहायला मिळत आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विधान भवन सुरक्षा कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आज कोणत्याही शासकीय कर्मचारी, अधिकारी किंवा इतर व्यक्तींना थेट प्रवेश दिला जाणार नाही. केवळ विशेष परवानगी पत्र असलेल्यांनाच विधान भवनात प्रवेश मिळणार आहे. याशिवाय आज सर्व प्रकारचे इतर पासेस रद्द करण्यात आले आहेत.

आज विधान मंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने सुरक्षेचा स्तर अधिकच वाढवण्यात आला आहे. कालच्या गोंधळामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विधान भवन परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त औंढा नागनाथ मंदिर शिवभक्तांच्या गर्दीने दुमदुमले

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात पावसाची विश्रांती, विदर्भात धो धो, वाचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पॅरामेडिकल पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

१२ वर्षाच्या मुलीवर २०० पुरूषांचा ३ महिने बलात्कार, देहविक्रीच्या दलदलीत चिमुकली कशी अडकली? मुंबई हादरली

Bhandara Crime : भंडारा दुहेरी हत्याकांडाने हादरले; सहा तासांत मारेकरी ताब्यात

SCROLL FOR NEXT