Government Aircraft Decesion News Saam Tv
Video

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Government Aircraft Decesion News : राज्य सरकारने सरकारी विमानं व हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डिसेंबर २०२५ च्या पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर होऊन बीम्स प्रणालीवर वितरीत केला जाणार आहे.

Alisha Khedekar

राज्य सरकारने सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्ससंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ च्या पुरवणी मागण्यांद्वारे सरकारी हवाई वाहनांसंदर्भात मागणी करण्यात आली होती. यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी ३ कोटींच्या दोन पुरवणी मागण्यांद्वारे ६ कोटींची मागणी केली होती. यावर लहान बांधकामे व यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उद्दीष्टासाठी वित्त विभागाची संमती दिली आहे.

शासनाच्या मालकीच्या हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्वाच्या कामांकरीताचा संभाव्य खर्च भागविण्यासाठी मागणी क्र. ए-४, लेखाशीर्ष क्र.२०७० ०१५६ (अनिवार्य) मधील "२७-लहान बांधकामे" व "५२-यंत्रसामुग्री व साधनसामुग्री" या उद्दिष्टांतर्गत अनुक्रमे रु.३,००,००,०००/- व रु.३,००,০০,০০০/-अशा एकूण रु.६,००,००,०००/- (रु. सहा कोटी फक्त) इतक्या रक्कमेच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने मान्यता दिली असून, सदर पुरवणी मागणी डिसेंबर, २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात मान्य करण्यात आली आहे. सदर पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला एकूण रु.६,००,००,०००/- (रु. सहा कोटी फक्त) इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यास वित्त विभागाने सहमती दर्शविली आहे. त्यानुसार सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT