Deepak Kesarkar On Maharashtra Ssc Board Result 2024 Saam Digital
Video

Video : ...म्हणून बदलापुरातील आंदोलकांवर लाठीचार्ज; दीपक केसरकर यांनी सांगितलं खरं कारण

Deepak Kesarkar : आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते, त्याचवेळी काही आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

Sandeep Gawade

बदलापूरमध्ये अत्याचार झालेल्या पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी आज बदलापुरात आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केलं. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते, त्याचवेळी काही आंदोलकांनी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. केसरकरांच्या या दाव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडालीय. बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी आंदोलन केले. बदलापूरकरांनी आपल्या मागणीसाठी तब्बल ११ तास रेल्वे रोको केला. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली, त्याच्या सर्व मागण्या मान्य करत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते, आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. मंत्री गिरीश महाजनाशी चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना घेरत त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT