Amit Shah Latest News in Mumbai  Saam TV
Video

Amit Shah News : गृहमंत्री अमित शहांनी घेतलं शिंदेंच्या 'बाप्पा'चं दर्शन; पाहा VIDEO

Amit Shah Latest News in Mumbai : वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.

Satish Daud

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी मुंबईत महायुतीतील घटकपक्षांची बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. आज अमित शहा मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहे. दर्शनापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी अमित शहांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच महायुतीतील इतर महत्वाच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले.

सागर बंगल्यावरील बाप्पाची देखील अमित शहा यांच्या हस्ते आरती होणार असून यानंतर ते लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी रवाना होतील. अमित शहा लालबागमध्ये दाखल होत असल्याने परिसरात पोलिसांना तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT