10 Budget Announcement SaamTv
Video

Union Budget 2025 : सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पातल्या १० मोठ्या घोषणा | VIDEO

Union Budget 10 Big Announcement : केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला असून सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दहा मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आलेल्या आहे.

Saam Tv

केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाची घोषणा केली आहे. गरीब, तरुण, अन्नदाता आणि महिला यांना विचारात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असल्याचं सीतारामन यांनी म्हंटलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केलेला दिसून येत आहे. नोकरदारवर्गाला 12 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तर TDS च्या मर्यादेत वाढ करून ज्येष्ठांना दिलासा देण्यात आला आहे. याचबरोबर इतरही काही मोठ्या घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आलेल्या आहेत.

  • १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे.

  • ५ लाख एससी, एसटी महिलांना उद्योगांसाठी 2 कोटींपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

  • २३ IITमधील विद्यार्थी संख्या दुप्पट करणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

  • मेडीकल कॉलेजमधील ७५ हजार जागा वाढवणार.

  • सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबॅंडने जोडण्यात येणार आहे.

  • सर्व जिल्हा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार होणार आहेत.

  • कॅन्सर आणि जीवनावश्यक ३६ औषध स्वस्त होणार आहे.

  • शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे.

  • उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची स्थापना.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDS मर्यादा ५० हजारांहून १ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात बेशिस्त बाइकस्वारांना विदेशी पाहुण्यांनी शिकवला धडा, VIDEO व्हायरल

मोठी बातमी! जामखेडमधील हॉटेलवर अंदाधूंद गोळीबार, रोहित पवारांच्या पायाला लागली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT