Shivaji Maharaj’s iconic forts Shivneri, Rajgad, and Lohagad from Pune district now honoured as UNESCO World Heritage Sites, symbolizing Maharashtra's glorious past. Saam Tv
Video

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Pune Forts in UNESCO Heritage Sites 2025: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांचा समावेश झाला असून, यामध्ये पुण्याचे शिवनेरी, राजगड आणि लोहगड या ऐतिहासिक किल्ल्यांचा गौरवशाली समावेश झाला आहे.

Omkar Sonawane

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ले आता जागतिक पातळीवर गौरवले गेले आहेत. युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून दर्जा दिला असून, यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, राजगड आणि लोहगड या तीन किल्ल्यांचा अभिमानास्पद समावेश झाला आहे.

युनेस्कोने या किल्ल्यांचा समावेश 'अद्वितीय वैश्विक मूल्य' या निकषावर केला आहे. हे किल्ले केवळ स्थापत्यशास्त्र किंवा भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यगाथेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

या १२ किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवनेरी हा शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या किल्ल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. तर राजगड हा त्यांच्या स्वराज्याचे पहिले राजधानीचा किल्ला होता, आणि लोहगड हा देखील त्यांच्या सैनिकी रणनीतीत मोलाचा ठरलेला किल्ला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT