Udhav Thackarey News SaamTv
Video

Udhav Thackarey : ठाकरेंचा पॉकेट साईज वचननामा जाहीर, मुंबईला दिलेल्या सागरी पुलाचे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा | Marathi News

Shivsena UBT Proclamation Declared : उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी आपला वचननामा जाहीर केला. मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासाचा शब्द या वचननाम्याद्वारे ठाकरेंनी दिला आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला वचननामा जाहीर केला. या वचननाम्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासाचा शब्द देत कोळी बांधवांना त्यांना हवा असणारा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणे, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्याने धारावीत उभारू अशी विविध आश्वासने ठाकरे गटाने या वचननाम्याद्वारे दिली आहेत. ठाकरे गटाचा हा जाहिरनामा पॉकेट साईज अर्थात खिशात मावणारा आहे. त्यावर एक क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यानंतर मतदारांना तो आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर पाहता येणार आहे.

विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचे दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. 'राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे. पण सध्याचे मिंधे सरकारच्या कारभारात याविषयीची कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यांनी केवळ गद्दारांना नोकऱ्यांना दिल्या. सर्वसामान्य जनतेला काहीच दिले नाही. पण आमचे सरकार महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना, मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल. या सरकारने मुंबईतील वित्तीय केंद्र गुजरातला पळवून लावले. पण आम्ही हे केंद्र धारावीत उभे करून तेथील जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊ', असं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंडं खराब झालंय हे घरच्या घरी कसं ओळखाल?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

SCROLL FOR NEXT