Sanjay Lakhe Patil's resignation sends shockwaves through Shiv Sena, raising serious concerns about party's internal leadership crisis. saam tv
Video

Maharashtra Politics उद्धव ठाकरेंना धक्केवर धक्के आज पुन्हा या बड्या नेत्यानी पक्षाला ठोकला रामराम|VIDEO

शिवसेनेचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले असून लोकसभा उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे राज्य सचिव असलेले डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिलाय . आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं सांगत, संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वरती गंभीर आरोप केलेत. लाखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला जालना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते त्यांनी पाळलं नाही.

याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटलांशी विशिष्ट समझोता करून सांगली लोकसभेची जागा घेऊन पराभव पदरात पाडून घेतल्याचा आरोप केलाय, दरम्यान रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिंकता येणारी जालना लोकसभेची जागा आपल्याकडे येणार नाही याची काळजी घेतल्याचे देखील त्यांनी म्हंटलय. याशिवाय सध्या मराठवाड्यात अंबादास दानवे यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही आपली होती मात्र हाच चोरलेला कार्यक्रम घेऊन अंबादास दानवे फुकट कौतुक पदरात पाडून घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT