Uddhav Thackeray taking a sharp dig at Eknath Shinde over his unexpected Delhi visit after the Mahayuti ministers’ boycott. Saam Tv
Video

कोणतरी गेलं बाबा मला मारलं..., उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली|VIDEO

Delhi Visit Controversy Of Eknath Shinde: महाराष्ट्रात महायुतीतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली असून मंत्र्यांच्या बहिष्कारानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याची खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

Omkar Sonawane

महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा बॉम्ब मंगळवारी फुटला आणि त्याचा परिणाम थेट झालेल्या मंत्रिमंडळावर झाला. शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरच उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

त्या वयात चांगलं शिक्षण मिळालं असतं, तर लाचारीची ही परिस्थिती आली नसती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना टोला लगावला आहे. बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं,' असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आयुष्यात चांगले शिक्षक आणि चांगले शिक्षण मिळाले नाही की काय होते, हे सध्या दिसत आहे, असेही ते म्हणाले. ज्यांना 'मशाली'चे महत्त्व कधीच कळले नाही, असे 'देवटे' आता निघाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor: ब्रेनमध्ये ट्यूमर निर्माण झाल्यास शरीरात दिसतात हे बदल

Government Scheme: 'या' राज्यातील लाडकींसाठी आनंदाची बातमी, उद्या खात्यात जमा होणार १०,००० रुपये

Maharashtra Live News Update: शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे गळ्यात गळे

Rupali Bhosle Photos: नऊवारी साडी अन् करारी नजर, रूपालीचा मराठमोळा लूक पाहून व्हाल फिदा

Nepal Protest : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, विमानतळ बंद

SCROLL FOR NEXT