Uddhav Thackeray meets Raj Thackeray at Shivtirth saam tv
Video

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

Raj Thackeray and Uddhav Thackeray Meeting Inside story : उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत आहे. या भेटीमागची इनसाइड स्टोरी बघा या व्हिडिओमधून.

Nandkumar Joshi

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोघेही दोन दशकांनी एकाच व्यासपीठावर आले. दोघांचीही भाषणं झाली. मनसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. आता मराठी भाषा आणि भाषकांसाठी झालेली युती राजकारणात अर्थात निवडणुकीतही होईल, असे अंदाज, अडाखे आणि तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. मध्यंतरी दोन्ही नेत्यांच्या कोणत्या न कोणत्या निमित्तानं भेटीगाठी होत राहिल्या. भविष्यातही होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठींना महत्व प्राप्त झाले आहे. त्यात आज, बुधवारी, १० सप्टेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आणि राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, असा प्रश्न ज्याला-त्याला पडला. आता या भेटीमागची इनसाइड स्टोरी संजय राऊत यांनी सांगितली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यासोबत होतो. राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलो. त्यात कुठलंही राजकारण नव्हतं. कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले; तेव्हा राज ठाकरेंच्या आईंनी निघताना उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की गर्दीत आपल्याला बोलता आलं नाही. त्यामुळं तुम्ही परत भेटायला या, असं सांगितलं होतं. त्यानुसार, उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या आईच्या भेटीसाठी घरी गेले, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

SCROLL FOR NEXT