Eknath Shinde Jai Gujarat Row Sanjay Raut saam tv
Video

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Jai Gujarat Row : पुण्यातील कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा दिल्यानं विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलं. त्यावर शिंदेंनी उद्धव ठाकरेंनीही जय गुजरात अशी घोषणा दिल्याचा जुना व्हिडिओ माध्यमांसमोर आणला. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तो व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

Nandkumar Joshi

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. शिंदेंनी पुण्यात केलेल्या जय गुजरात घोषणेचा आवाज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घुमला आणि शाब्दिक युद्धाला तोंड फुटलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांसह मनसेच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्ला चढवला. या शाब्दिक हल्ल्याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही उद्धव ठाकरेंचा जुन्या भाषणाचा आणि त्यातील जय गुजरात घोषणेचा 'व्हिडिओ'रुपी बाण सोडून परतवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागलीच एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांसमोरच उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला. तसंच केम छो वरळी...असं जुनं बॅनर दाखवून आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा जुना व्हिडिओ दाखवून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, संजय राऊत यांनी प्रतिहल्ला केला. उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे हे प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं. तो व्हिडिओ गुजरातमधील प्रचारसभेचा असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

२०१९ साली गांधीनगरमध्ये जी सभा झाली, त्यातील भाषणाचा तो व्हिडिओ आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी अहमदाबादमध्ये पायघड्या घातल्या होत्या. तुम्हाला यावेच लागेल असे अमित शहा त्यावेळी म्हणाले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी करून दिली. उद्धव ठाकरे हे गुजरातमध्येच झालेल्या सभेत जय गुजरात म्हणाले आहेत. ते महाराष्ट्रात जय गुजरात म्हणाले नाहीत, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates : पंढरपुरातून मराठा आरक्षण आंदोलनकांना मदत

Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? मध्यरात्री परळी स्थानकावर चिमुरडीला नेलं अन् बलात्कार

Pune Crime : महिलांचा वेश करून कंपनीमध्ये चोरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार, सराईत चोरटे अटकेत

Nargis Fakhri Wedding: बॉलिवूड अभिनेत्रीने वयाच्या ४५ व्या वर्षी थाटला संसार; बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न

Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; २८०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT