Nargis Fakhri Secret Wedding: बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नुकतीच तिच्या गुप्त लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. नर्गिस आपल्या पती टोनी बेजसोबत मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होती. या खास रेड कार्पेट लूकमध्ये नर्गिस वाइन रंगाच्या लेहेंगा-चोलीत खुलून दिसत होती, तर टोनी काळ्या शेरवाणी आकर्षक दिसत होता.
यावेळी चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांनी टोनीला थेट सांगितलं, “तुझ्या पत्नीच्या बाजूला उभा राहा”. हा क्षण लगेचच कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना आता अधिकृत शिक्कामोर्तब मिळाल्यासारखं वाटतं आहे.
नर्गिस आणि टोनी यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये अतिशय खाजगी सोहळ्यात लग्न केल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. आता या पहिल्या सार्वजनिक उपस्थितीत त्यांचं नातं सर्वांसमोर आलं असून चाहत्यांकडून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नर्गिस फाखरी ही रॉकस्टार, मद्रास कॅफे, मैं तेरा हीरो अशा चित्रपटांमधील भूमिकांमुळे ओळखली जाते. तिच्या लग्नानंतरच्या या पहिल्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.