अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे: गेल्या २ दिवसांपासून पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीचा संपूर्ण भारतातून विरोध होतोय. तुर्की चे सफरचंद, ड्रायफ्रूट्स ते अगदी तुर्कीमधून येणाऱ्या बहुतांश वस्तूंवर आता बहिष्कार टाकायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रो चे काम टर्किश कंपनी गुलेरमॅक कडे आहे. महा मेट्रो कडून २०१९ मध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मार्गावर असलेल्या तीन स्टेशनच्या टनलिंगसाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. अनेक कंपन्यांनी हा प्रकल्प मिळावा यासाठी प्रयत्न केला होता मात्र अखेर हे काम टाटा प्रोजेक्ट आणि टर्किश कंपनी गुलेरमॅक यांना जॉइंट वेंचर म्हणून मिळाले.
या प्रकल्पासाठी २२८३ कोटी रुपयांचा करार झाला. यामध्ये पहिल्या २.५ किलोमीटरसाठी ११२७ कोटी रुपये तर दुसऱ्या २.५ किलोमिटर साठी ११५६ कोटी रुपये एवढी किंमत होती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या एकूण १६.६५ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉर-I मधील ५.०१९ किलोमीटरचा भाग कसबा पेठ, बुधवार पेठ आणि मंडई या सारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमधून गेला आहे. सिव्हिल कोर्ट आणि स्वारगेट हे सुद्धा भूमिगत मेट्रो स्टेशन आहेत अशा एकूण ५ स्थानकांच्या टनलिंगसाठी या कंपनीला काम देण्यात आले.
मागील वर्षी या सर्व मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झालेले असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोमधून आज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. एका बाजूला टर्की देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय पण दुसऱ्या बाजूला आज ही भारतात अनेक प्रकल्प आहेत ज्याचे काम गुलेरमॅक अशा टर्किश कंपन्यांना दिले गेले आहे. साहजिकच ज्यावेळी या कंपन्यांसोबत आपल्या सरकार ने करार केले तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात असलेला तणाव इतक्या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं. पाकिस्तानला जाहीर पाठिंबा देत असलेल्या टर्की विरोधात आता भारत सरकार आगामी काळात आणखी काय कठोर भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.