पुण्याच्या ग्रामीण भागात धावणारी एसटीची लालपरीची दैनिय अवस्था समोर आली. ओतूर ते नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाचा दरवाजा नसल्याने सुरक्षित प्रवासाची हमी देणा-या एसटी चालकच सुरक्षित नसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दिवाळीच्या सुट्टीतला ग्रामीण भागातला एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय ओतुरवरुन नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बस पिंपळवंडी गावात आल्यानंतर एसटीच्या चालकाचा दरवाजा नसल्याचे लक्षात आलंय.
चालकच सुरक्षित नसल्याने बसमधून प्रवाशांना धोक्यात आणणारी ही अवस्था अनेकदा बघितलीय. चालकाच्या बाजूचा दरवाजा नसतानाही प्रवाशांना बसमध्ये घेऊन जाणे हे पायाभूत सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ग्रामीण भागात एसटी बस सेवा लोकांसाठी जीवनदायी आहे. पण आज तीच सेवा एसटी चालकासह प्रवाशांच्या वाट पाहातेय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी टेस्ला कारची खरेदी केली होती. यावरूनच आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी यावरून उपरोधिक टीका केली आहे. परिवहन मंत्र्यांकडे टेस्ला कार मात्र प्रवाशांसाठी दरवाजा नसलेली एसटी बस अशी प्रतिक्रिया लोकांनी सोशल मीडियावर दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.