Crowds mourn as tragedy strikes during Dahihandi practice in Dahisar, claiming the life of 11-year-old Mahesh Jadhav. Saam Tv
Video

आनंदोत्सवाआधीच हळहळ; दहीहंडी सरावात गोविंदाचा मृत्यू, दहिसरमधील घटना|VIDEO

Child Govinda Death In Dahisar Festival: दहिसर (केतकीपाडा) येथे दहीहंडी सरावादरम्यान ११ वर्षीय बाल गोविंदाचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर दहीहंडी पथकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

दहिसर (केतकीपाडा) येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान घडलेल्या भीषण घटनेत अकरा वर्षीय महेश रमेश जाधव या बाल गोविंदाचा मृत्यू झाला असून, या प्रकारामुळे दहीहंडी पथकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश आपल्या पथकासोबत सराव करत असताना तोल जाऊन पडला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लहान वयाच्या गोविंदांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेताल सराव पद्धतीवर टीका होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांचा वापर न करणे आणि प्रशिक्षणात योग्य देखरेख नसणे हे अशा अपघातांना आमंत्रण देते. अनेक पथके अजूनही कोणत्याही ठोस सुरक्षा नियमांशिवाय उंच मानवी मनोरे उभारताना दिसतात. या पार्श्वभूमीवर नागरिक व सामाजिक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की, दहीहंडी सराव व स्पर्धांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करून तिचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT