मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

Death of Child Govinda in Mumbai: दहिसरमध्ये दहीहंडी सरावात ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू. हेल्मेट, सेफ्टी बेल्टसारखी सुरक्षा साधने वापरली नव्हती. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली.
Death of Child Govinda in Mumbai
Death of Child Govinda in MumbaiSaam TV News
Published On
Summary
  • दहिसरमध्ये दहीहंडी सरावात ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू.

  • हेल्मेट, सेफ्टी बेल्टसारखी सुरक्षा साधने वापरली नव्हती.

  • अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली.

  • नागरिकांनी कठोर सुरक्षा नियम लागू करण्याची मागणी केली.

दहिसरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहीहंडी सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. पथकासोबत थर लावत असताना त्याचा तोल गेला. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीनं रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश रमेश जाधव (वय वर्ष ११) असे मृत चिमुकल्याचं नाव आहे. तो दहिसर (केतकीपाडा) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी महेश आपल्या पथकासोबत सराव करत होता. सराव करत असताना त्याला झेलण्यासाठी खाली फार माणसं नव्हती.

Death of Child Govinda in Mumbai
इंडिया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा, मतचोरीविरूद्ध राहुल गांधींसह ३०० खासदारांचा एल्गार; मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार?

दरम्यान, थरावर चढत असताना त्याचा तोल गेला आणि थेट खाली कोसळला. उंचीवरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या दुर्देवी मृत्यूनंतर जाधव कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लहान वयाच्या गोविंदांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेताल सराव पद्धतीवर टीका होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांचा वापर न करणे आणि प्रशिक्षणात योग्य देखरेख नसणे हे अशा अपघातांना आमंत्रण देते. अनेक पथके अजूनही कोणत्याही ठोस सुरक्षा नियमांशिवाय उंच मानवी मनोरे उभारताना दिसतात.

या पार्श्वभूमीवर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की, दहीहंडी सराव व स्पर्धांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करून तिचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Death of Child Govinda in Mumbai
कामाची भूलथाप, तृतीयपंथीयासह तिघांकडून आळीपाळीनं बलात्कार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com