wardha news saam tv
Video

धक्कादायक...! तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न, ट्रॅक्टर मालकासोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Chaos in Hinganghat: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तहसीलदाराच्या कार्यालयात ट्रॅक्टर मालकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा: येथील हिंगणघाट तहसील कार्यालयात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. छोटू दिलीपराव वानखेडे या ट्रॅक्टर मालकाने तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न करत खळबळ उडवून दिली. यावेळी त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तात्काळ पोलीसांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतलं.

छोटू वानखेडे याचा आरोप आहे की, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. वानखेडेच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांना नियमित हप्ते दिले जात असूनही त्याच्या गाड्या अडवून ठेवल्या जातात, तर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने वाळू माफियांना प्रशासनाचा खुलेआम पाठिंबा आहे.

त्याने हेही सांगितले की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि उत्खनन होत असून, अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. उलटपक्षी गरीब शेतकऱ्यांवर आणि सामान्य ट्रॅक्टर मालकांवर अन्याय केला जातो. श्रीमंत माफियांना एक न्याय आणि आम्हा गरीबांना दुसरा न्याय दिला जातो, असं म्हणत त्याने तहसीलदार आणि SDO यांच्यावर पक्षपाती कारभाराचा आरोप केला.

घटनेवेळी वानखेडेने तहसीलदारांच्या दालनात एक आरोपपत्रही फेकले. या प्रकारामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली असून, पोलिसांनी वानखेडे याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT