Beed Gas Cylinder Saam Tv
Video

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Beed Gas Cylinder: बीडमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा असताना काळाबाजार केला जात आहे. गॅस सिलिंडरचे ३ ट्रक लपवून ठेवण्यात आले. हेच सिलिंडर जास्त किमतीत विकले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरूवात झाली आहे. या युद्धामुळे राज्यातील अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद होऊ लागले आहेत. बीडमध्ये गॅस सिलिंडर मिळावा यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरने भरलेले ३ ट्रक एका पंपाच्या बाजूला उभे केले आहेत. हा संपूर्ण प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील आहे. साईलीला नावाच्या एजन्सीने सिलिंडरने भरलेले ३ ट्रक एका साईडला लावले आहेत. यामुळे ग्राहकांना वेठीस धरणे त्याचबरोबर मूळ किंमत सोडून जास्त पैसे आकारणे हा धंदा सध्या बीडमध्ये सुरू झाला आहे. सिलिंडर स्टॉक करून ठेवून त्यानंतर विकणे हा प्रकार बीडमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT