Nashik Police convoy heading to Mumbai to execute arrest warrant against Manikrao Kokate. Saam Tv
Video

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Manikrao Kokate Lilavati Hospital: माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे विशेष पथक मुंबईत दाखल होत आहे. ३ वरिष्ठ अधिकारी आणि २० पोलिसांच्या उपस्थितीत मोठी कारवाई होण्याची शक्यता असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांची विशेष टीम लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. कोकाटेंवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले असून यामध्ये 3 वरिष्ठ अधिकारी, आणि 20 पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे.

सध्या माणिकराव कोकाटे हे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अटक वॉरंट बजावण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून नाशिक पोलिस मुंबईत पोहोचताच पुढील कारवाई केली जाणार आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT