Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Mumbai And Nagpur Court Bomb Threat Emails : मुंबईतील वांद्रे न्यायालय आणि नागपूर जिल्हा न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. खबरदारी म्हणून न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आले असून पोलीस व बॉम्ब शोधक पथके तपास करत आहेत.
Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ
Mumbai And Nagpur Court Bomb Threat EmailsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई व नागपूर न्यायालयांना ईमेलद्वारे बॉम्ब धमकी

  • न्यायालयीन कामकाज तात्पुरते स्थगित

  • बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून तपास

  • सायबर पथके धमकीच्या ईमेलचा स्रोत शोधत आहेत

राज्यातील सर्वाधी गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई शहरातील वांद्रे न्यायालयाला आज एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आजचं सकाळी नागपूर न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेल द्वारे मिळाली आहे. दोन्ही महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे मेल आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज १८ डिसेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी वांद्रे न्यायालयाला एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या धमकीचा मेल आल्यानंतर स्थानिक पोलिस पथके आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथके घटनास्थळी दाखल झाली. या अलर्टनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा तपासणी सुरू केली आणि परिसरात सतर्कता वाढवली.

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ
Today Weather : राज्यात थंडीचा कहर! जेऊरचा पारा ६ अंशांवर, मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’, आज कसं असेल हवामान? वाचा

खबरदारीचा उपाय म्हणून, न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आले आणि वकील, कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावित न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. शिवाय, पोलिस अधिकाऱ्यांनी या परिसरांना वेढा घातला आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे, तर सायबर पथके धमकी देणाऱ्या ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी काम करत आहेत.आतून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही आणि बाहेरून कोणालाही आत येण्याची परवानगी नाही, तरीही परिसरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ
Ladki Bayko Yojana : लाडकी बहीण नव्हे, लाडकी बायको योजना! काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं भाजप नेत्यावर टीकास्त्र

तर दुसरीकडे नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला इमारतीच्या आत "बॉम्ब" असल्याचा दावा करणारा ईमेल मिळाला. या धमकीमुळे स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि परिसराची पाहणी सुरु केली मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी न्यायालयाच्या ईमेल आयडीवरून ईमेल पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या इमारतीत लवकरच दोन आरडीएक्स -आधारित स्फोटक उपकरणे स्फोट होतील. दरम्यान अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा न्यायालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाचे कर्मचारी परिसराची तपासणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com