नांदेडच्या लोहा तालुक्यातील वागदरवाडी या गावात रस्ता तसेच मूलभूत सुविधा देखील नाहीत त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. वागदरवाडी गावातील 300 जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत. परंतु याच देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात मुलभूत सुविधा नसल्याने सैनिकांचे वृद्ध आई आणि वडीलांचे प्रचंड हाल होत असून रस्ता आणि मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी दोन जणांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. परंतु या उपोषणाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त केली आहे. सुविधा द्या अन्यथा सीमेवर लढणारे आमची मुलं परत पाठवा अशी मागणी या सैनिकांच्या संतप्त पालकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.