Maharashtra News Live Updates: विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 25 November 2024: आज सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणूक निकालानंतर आज नव्या सरकारची स्थापना, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, महाराष्ट्रातली थंडी, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Mumbai News:  विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही

मनसेच्या चिंतन बैठसाठी नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, स्नेहल जाधव, अविनाश अभ्यंकर आणि मनसेचे उमेदवार शिवतीर्थवर दाखल

ठाण्यातील मनसे उमेदवार अविनाश जाधव, अभिजित पानसे दाखल, कल्याणचे पराभूत उमेदवार राजू पाटील सुद्धा बैठकीसाठी दाखल

Mumbai News: आमदार बापू पठारे घेणार शरद पवारांची भेट

आमदार बापू पठारे घेणार शरद पवारांची भेट

मुंबईत संध्याकाळी ५ वाजता बापू पठारे शरद पवारांची भेट घेणार

बापू पठारे पुणे शहरातील महा विकास आघाडी चे एकमेव विजयी उमेदवार

वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे यांनी विजय मिळवला

अजित पवारांच्या राष्ट्रवादी चे सुनील टिंगरे यांचा केला पराभव

Mumbai News -  देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा

भाजपाच्या पाठीबामुळे चार सहयोगी पक्षतील आमदार निवडून आले

विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा

5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर

महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती

Nagpur News: शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी आशिष जैस्वाल यांचं नाव चर्चेत

- विदर्भातून नागपूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी आशिष जैस्वाल यांचं नाव चर्चेत

- रामटेकमध्ये जाहिर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आशिष जैस्वाल यांना मंत्री करण्याचं दिलं होतं आश्वासन

- आशिष जैस्वाल गेले पाच टर्म रामटेक विधानसभेतून आमदार आहेत

- सिनियर आमदार असल्याने आशिष जैस्वाल यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता दाट

- विदर्भात शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी आशिष जैस्वाल यांच्या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता..

Mumbai News:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आले

निवडून आलेल्या सगळ्या आमदारांची वाय बी सेंटर येथे दुपारी बैठक

पक्षाचे प्रमुख शरद पवार, खा अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदारांनी करणार मार्गदर्शन

निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्या होणार बैठक

Ratnagiri News: रत्नागिरीतील कशेडी बोगदा 15 दिवसांसाठी बंद राहणार

रत्नागिरी - कशेडी बोगदा 15 दिवसांसाठी बंद राहणार

पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात 15 दिवस बंद राहणार

मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली

राष्ट्रीय महामार्ग विभागाची माहिती

Pune News: एसटी बसच्या अपघातात सातत्याने वाढ, वर्षभरात 3 हजार 381 अपघात 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे वर्षभरात 3 हजार 381 अपघात झाले आहेत.

एसटी बसच्या अपघातांत सातत्याने वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर चालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक आगारात समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Pune News:  भाजपचे नेते संजय काकडे यांनी केलं फडणवीस यांचं अभिनंदन

भाजपचे नेते संजय काकडे यांनी केलं फडणवीस यांचा अभिनंदन

सागर बंगल्यावर जाऊन संजय काकडेंनी फडणवीसांची घेतली भेट

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असावेत अशी व्यक्त केली इच्छा

विधानसभा निवडणुकीआधी संजय काकडे भाजपात होते नाराज

मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांची भेट घेऊन त्यांचे नाराजी दूर केली होती.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केले कौतुक...

संजय काकडे भाजपामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार...

Pune News:  पुणे जिल्ह्यात आमदारांमध्ये चार नवीन चेहरे

पुणे जिल्ह्यात आमदारांमध्ये चार नवीन चेहरे

जिल्‍ह्यात तीन माजी आमदारांना पुन्‍हा विधानसभेची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.

माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Pune News: संस्कृतीक मंत्रीपद आपल्याकडे घ्या, अजित पवारांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्कृतीक विभागाची अजित पवारांकडे मागणी

संस्कृतीक मंत्रीपद आपल्याकडे घ्या

महायुती सरकार असताना अनेक कलाकारांचे प्रश्न सोडवले आहेत मात्र आता खात अपलकडे घेण्याची केली मागणी

अजित पवारांना दिल पत्र

या आधी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी पहिला आहे कारभार

Delhi News: संसदेतील INDIA आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची आज बैठक

नवी दिल्ली -

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेतील INDIA आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची आज बैठक

सकाळी १० वाजता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात होणार बैठक

अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित

कोणते मुद्दे घेऊन आक्रमक व्हायचं यावर बैठकीत चर्चा होणार

Mumbai News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावली महत्वाची बैठक 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पार पडणार बैठक

दादर येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक

मनसेतील सर्व प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थितीत

विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते

मात्र राज्यात एक ही उमेदवार विजयी न झाल्यामुळे आता राज ठाकरे काय आजच्या बैठकीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष

Mumbai News: आमदार हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबईतील निवासस्थानी रासने यांनी घेतली फडणवीस यांची भेट

पुण्यातील बहुचर्चित असलेल्या कसब्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता

रासने यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत कसबा पुन्हा भाजपकडे आणला

Pune News: पुण्यात पोटनिवडणुकीत गमावलेला कसबा भाजपने पुन्हा जिंकला

पुण्यात पोटनिवडणुकीत गमावलेला कसबा भाजपने पुन्हा जिंकला

कांग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने केला पराभव

हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

भेटीत फडणवीसांनी केला रासनेंचा सत्कार

Pune News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकींचे वेध

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकींचे वेध

महापालिका निवडणूक घेण्याची आतापासूनच कार्यकर्त्यांची मागणी

नवीन वर्षात महापालिका निवडणूक होण्याच्या शक्यता

मात्र कोर्टात या विषयी ३० याचिका दाखल आहेत

नवीन प्रभाग रचना करणे गरजेच आहे त्यामुळे आता नवीन प्रभाग रचना होणार का ?

महाविकास आघाडी सरकार असताना केला होता ३ चा प्रभाग याल न्यायालयात दिल होत आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com