Thane Municipal Corporation elections Saam TV Exit Poll  saam tv
Video

Saam TV Exit Poll: ठाण्यात महायुतीची सत्ता, बाल्लेकिल्ल्यात एकनाथ शिंदे ठरले 'किंग', तर भाजप नंबर दोनचा पक्ष

Thane Corporation Elections Saam TV Exit Poll: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी जबरदस्त कामगिरी केल्याचं दिसत आहे. मतदानानंतर एक्झिट पोल आले असून यात शिंदे गट एक नंबरचा पक्ष ठरलाय.

Bharat Jadhav

  • ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सकाळी मतदानाचा उत्साह

  • ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक निवडले जाणार

  • भाजप-शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधूंची आघाडी

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळच्या सत्रात उत्साह दिसून आला. ठाणे महापालिलेच्या ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती झालीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवलीय. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान महापालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आलेत. एकनाथ शिंदेंची बाल्लेकिल्ला असलेली ठाणे महानगरपालिकेत शिंदेंच किंग राहणार असल्याचा अंदाज सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आलाय. शिंदे गट शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला दोन नंबरचा पक्ष ठरणार असून त्यांच्या वाट्याला २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला सर्वाधिक ७२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT