yavatmal news  Saam Tv
Video

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा राजकीय जन्म मातोश्रीवर झालाय, ठाकरे गटाचा हल्लाबोल, VIDEO

Thackeray Group Slams Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे, शिंदे आज यवतमाळ दौऱ्यावर होते.

Omkar Sonawane

यवतमाळ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज यवतमाळमध्ये आभार दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळालेच पाहिजे. या घोषणा देत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील संविधान चौकात जोरदार आंदोलन केले. हे सरकार फसव आहे.निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ तसेच लाडक्या बहिणीना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.

मात्र आता हे सरकारच सांगत आहे की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही म्हणून आम्ही हे उग्र आंदोलन करत आहोत अशी प्रतिक्रिया प्रवीण शिंदे यांनी दिली. काहीवेळा पूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर वक्फ विधेयकवरून टीका केली होती. यावरच यवतमाळच्या जिल्हाप्रमुखाने एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदे यांचा राजकीय जन्म हा मातोश्रीवर झाला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवला यांनी हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT