Surat Rain Saam TV
Video

Surat : सूरतमध्ये पावसामुळे हाहाकार; रुग्णाला खाटेवरुन नेण्याची वेळ, पाहा थरारक दृश्य | VIDEO

Ambulance Blocked by Floods in Surat : सूरतमध्ये पावसाने थैमान घातल आहे. परिसरातील रस्ते तुडूंब भरलेले आहेत. अशातच एका रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्याची परिस्थिती निर्माण झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरतमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांत चार ते पाच फूटांपर्यंत पाणी साचल्याने रहदारी आणि आपत्कालीन सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच एका रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात नेण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पाण्यानी तुडूंब भरलेल्या रस्त्यांमुळे रुग्णवाहिका रुग्णाच्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही.

यामुळे परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून त्या पाण्यातून चालत रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. या घटनेमुळे नागरिकांच्या माणुसकीचे दर्शन घडले असले तरी, पुराच्या पाण्यात अडकलेल्या शहर व्यवस्था आणि आपत्कालीन सेवेची अडचण पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशासनाकडून अद्याप पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

SCROLL FOR NEXT