navi mumbai  saam tv
Video

Navi Mumbai Rain: नवी मुंबईत जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ|VIDEO

Unexpected Showers Hit Belapur: नवी मुंबई येथील सीबीडी बेलापुरमध्ये जोरदार पावसाने सुरुवात केली असून यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबई आणि मुंबईत आज दुपारी अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिति निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

बेलापूर परिसरात अचानक धुके दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बेलापूरचे सह्याद्रीच्या नजीकचे भौगोलिक स्थान याला कारणीभूत ठरत असल्याचे हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज आहेत.

मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यांवर जाणाऱ्या नागरिकांना थांबवले आहे. याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबण्याची शक्यता आहे. प्रशासन सज्ज असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

Pune Bribe Case : महसूल विभागात खळबळ! पुण्यात बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Gautami Patil Photos : दिसतीया भारी, नेसुनी साडी; काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही...

पडद्यावर साधी, खऱ्या आयुष्यात बोल्ड! 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवा लूक पाहून फॅन्स झाले घायाळ

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT