Chandrapur district  saa,m tv
Video

Unseasonal Rain: ऐन उन्हाळ्यात तुफान पाऊस; चंद्रपूर जिल्ह्यात अचानक कोसळल्या पावसाच्या धारा|VIDEO

Chandrapur district: आज चंद्रपूर जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. विशेषतः नागभीड आणि मूल तालुक्यात वादळ, पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली.

Omkar Sonawane

चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत वादळाने आणि पावसाने हजेरी लावली. नागभीड आणि मूल तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला असून, काही भागांत गारपीटही झाली आहे.

नागभीड शहरात वादळामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. त्यानंतर आलेल्या पावसाने शहरासह परिसर झोडपून काढला. तालुक्यातील काही भागांत गारांचा मारा झाल्याचीही माहिती आहे.

सध्या शेतकऱ्यांकडील भाताचे उन्हाळी पीक कापणीच्या तयारीत असताना हा अचानक आलेला पाऊस आणि गारपीट यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीसाठी पुण्यातील दोन मुक्कामाचा पालखी मार्ग बदलणार?

Sonam Kapoor : ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

India Travel : राजेशाही वास्तुकला, अप्रतिम सूर्यास्त; 'हा' किल्ला पाहताच आठवेल प्राचीन इतिहास

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २४ तास! लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम अन्यथा ₹४५०० रुपये विसरा

SCROLL FOR NEXT