Tension prevailed in Barshi after municipal election results as rival groups clashed and resorted to stone pelting, an incident captured on CCTV. Saam Tv
Video

लोकशाहीला डाग! निकालानंतर राडा; दोन गटांत तुफान दगडफेक|VIDEO

Post Election Violence Shocks Barshi: नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर बार्शीत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. आयनापूर मारुती रोड परिसरातील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

बार्शी: नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शहरात अनुचित प्रकार घडल्याने लोकशाही प्रक्रियेला गालबोट लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दोन गटांमध्ये अचानक तुफान दगडफेक झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.ही दगडफेक बार्शीतील आयनापूर मारुती रोड परिसरात घडली असून संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ही दगडफेक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT