Fake pastor Ravi allegedly lured Solapur women into converting religions with promises of money and mysterious red drink. Saam Tv
Video

Solapur News: तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचा धर्म स्वीकारा; सोलापुरातील कथित फादर विरोधात गुन्हा|VIDEO

Solapur Religious Conversion: सोलापूरमध्ये कथित फादरने महिलांना ‘तुमचे देव शैतान आहेत’ म्हणत १० हजारांचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर: तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म स्वीकारा. तुम्हाला 10 हजार रुपये दिले जातील. असे आमिष दाखवून धर्मांतरसाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी फादर असे या 55 वर्षीय कथित फादरचे नाव आहे. सोलापुरातील सेटलमेंट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्येच रवी याने चर्च थाटले होते. परिसरात राहणाऱ्या महिलांना तुम्ही या चर्चमध्ये येतं जा, तुमचा देव शैतान आहे. तो तुमचे कल्याण करणार नाही. त्यामुळे त्या देवाला पाण्यात टाकून आमचे देव स्वीकारा तुम्हाला 10 हजार रुपये दिले जातील. अशा पद्धतीने आमिष दाखवत होता.

20 जुलै रोजी असाच प्रकार घडल्यानंतर सेटलमेंट परिसरात राहणाऱ्या महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. यावेळी रवी याने तयार केलेल्या चर्चमध्ये काही महिला बसल्या होत्या. त्यांना आरोपी रवी फादर हा वाईन सदृश्य लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी देत होता असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आरोपी कथित फादर रवी फादर याच्या विरोधात सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Infection: पोटात इन्फेक्शन असेल तर दिसतात 'ही' लक्षणं

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये पावसाचे जोरदार आगमन

Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

Ajit Pawar: मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे- अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक महिला आमदाराला भोवलं, पक्षप्रमुखांनी केली थेट बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT