Solapur Pune Expressway Closed SAAM TV
Video

Solapur Pune Expressway Closed : सीना नदीच्या प्रवाहात वाढ! सोलापूर- पुणे महामार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद | VIDEO

Solapur Sina river flood : सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूरात मुसळधार पावसामुळे सीना नदिच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या लांबोटी पुलावर पाण्याची पातळी वाढल्याने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. तसेच दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT