Solapur SAAM TV
Video

Solapur : नुकसान पाहणीचा रात्रीस खेळ चाले, सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा | पाहा VIDEO

Central Government Team : सोलापुरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात केली. या औपचारिक पाहणीवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक वादात सापडले आहे. 'सोलापुरात केंद्रीय पथकानं चक्क रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानाची पाहणी केली आहे,' ही घटना शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारी असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. पूरस्थितीनंतर तब्बल एका महिन्याने हे पथक सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळेगावात पोहोचले, मात्र त्यांनी दिवसाउजेडी पाहणी करण्याऐवजी रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणीचा केवळ दिखावा केला. या अजब पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, पथकाच्या कार्यपद्धतीवर आणि मदतीच्या तत्परतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकारामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य मदत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

Rohit Sharma: रोहित शर्माची २०२७ वर्ल्डकपमधील जागा धोक्यात? माजी मुख्य निवडकर्त्याचे खळबळजनक वक्तव्य

Maharashtra News Live Update: शिवसेना शिंदे गट नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद नंदुरबार दौरा

माजी मंत्र्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

K Annamalai : भाजपला मोठा धक्का, के. अन्नामलाई यांचा राजीनामा; नव्या राजकीय पक्षाची घोषणा

SCROLL FOR NEXT