Shrikant Shinde meets Uddhav Thackeray’s trusted aide Milind Narvekar at his residence during Ganesh festival Saam Tv
Video

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याच्या घरी श्रीकांत शिंदे, भुवया उंचावल्या | VIDEO

Political impact of Shrikant Shinde Visit: श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

श्रीकांत शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.

नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे गेल्या 28 वर्षांपासून विश्वासू मानले जातात.

या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

गणेश दर्शनाचे औचित्य असले तरी राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष सुरू झालाय. मिलिंद नार्वेकर हे गेली 28 वर्ष उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत. त्यानंतर ते शिवसेनेचे सचिव देखील होते आणि आज ते विधानपरिषदेचे आमदार देखील आहे. एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना घेऊन सूरत गेले होते आणि महाविकास आघाडी सरकार जवळपास पडणार असल्याचे निश्चित होते त्यावेळी उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर खूप विश्वास आहे असे सांगितले जाते. श्रीकांत शिंदे यांनी जरी ही भेट गणपती दर्शनासाठी घेतली असेल तरी राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT