Police investigation underway after a minor student was attacked in his sleep at a Palghar ashram school. Saam Tv
Video

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

Ashram School Student Attacked: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेत झोपेत असताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचे डोक्यावरील व भुवयांवरील केस कापण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Omkar Sonawane

पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या चास गावातील आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचे रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने डोक्यावरील केस विचित्रपणे कापल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्याच्या डोळ्यांवरील भुवयांचे केसही कापण्यात आले आहेत.

या प्रकारात विद्यार्थ्याच्या डोक्याला जखमाही झाल्याचे समोर आले असून सकाळी हा प्रकार लक्षात येताच शाळेत एकच खळबळ उडाली. संबंधित विद्यार्थ्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती संबंधित प्रशासन व पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि जबाबदारीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT