Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

Hingoli Crime : सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आश्रम शाळेतील शिक्षकाने कार्यालयात अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
11 year Old Girl Physical Abused
Hingoli Crime News
Published On

राज्यात खळबळ उडून देणारी आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमधील आश्रम शाळेत एका ११ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. १३ तारखेला आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार झाला.१३ तारखेच्या रात्री शिक्षकाने विद्यार्थिनीला झोपेतून उठवत स्वतःच्या कार्यालयात नेले आणि त्याच्यावर अतिप्रसंग केला. पीडित विद्यार्थिनीचे पालक शेतमजूर आहेत.

या घटनेची माहिती इतर शिक्षकांना मिळताच पीडितेच्या पालकांना याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी बाळापूर पोलीस स्टेशनला नराधम आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.

11 year Old Girl Physical Abused
Shocking: आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार, हत्या करून मृतदेह शेतात पुरला

अश्लील व्हिडिओ पाहून वृद्धेचे भयानक कृत्य, ७ वर्षीय मुलीचा छळ

पुण्यातील लोहगावात एका वृद्ध व्यक्तीनं एक चिमुकल्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आरोपीच्या घरी ये-जा करीत होती. आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत खेळायला जात होती. मात्र, वृद्ध आरोपी मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून मुलीसोबत अश्लील वर्तन करत होता. याची माहिती पीडितेच्या मत्रीने आपल्या पालकांना दिली त्यानंतर वृद्धविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

11 year Old Girl Physical Abused
Dombivli Crime : मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य, डोंबिवलीत संतापजनक घटना

पीडितेच्या आईनं चिमुकलीला याबाबत विचारपूस केली. आधी चिमुकली प्रचंड घाबरली होती. त्यानंतर चिमुकलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी त्वरीत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com