Police at the crime scene in Solapur’s Ramabai Ambedkar Nagar after the shocking murder of Yashoda Siddhganesh. Saam Tv
Video

कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या; परिसरात खळबळ|VIDEO

Solapur Ambedkar Nagar: सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा पतीकडून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

सोलापूर येथील रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यशोदा सुहास सिद्धगणेश (वय ३५) या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास यशोदा या गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेतली असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, यशोदा यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. यशोदा आणि सुहास या दांपत्याला दोन मुली आणि एक मुलगा असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT