Nashik woman claims her husband sent a handwritten ‘Triple Talaq’ letter via courier from Bihar and Canada; police register FIR. Saam Tv
Video

बिहार आणि कॅनडातून कुरियरने पाठवला ‘ट्रीपल तलाक’; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकरण उघड|VIDEO

Handwritten Triple Talaq Sent By Husband To Wife: नाशिकमध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने बिहार आणि कॅनडातून कुरियरद्वारे स्वहस्ताक्षरातील ‘ट्रीपल तलाक’ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक शहरातील मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विवाहितेला तिच्या पतीने थेट बिहार आणि कॅनडामधून 'ट्रीपल तलाक'चे स्वहस्ताक्षरातील लेखी कागद कुरियरद्वारे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या पतीसह सासु, सासऱ्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झाल्यानंतर २४ जानेवारी २०२२ ला विवाहितेचा मुस्लिम पद्धतीनुसार संशयित आरोपीसोबत विवाह (निकाह) झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू-सासरे यांनी बिहार व कॅनडामध्ये शारिरिक-मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेरच्यांकडून विवाहितेने पैसे आणून दिले नाही, म्हणून सासु-सासऱ्यांसह पतीने शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. तसेच लग्नात मिळालेले आठ तोळ्यांचे दागिनेदेखील बळजबरीने अंगावरुन काढून घेत हाकलून दिले. त्यानंतर पतीने लेखी स्वरुपात स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह ट्रीपल तलाकचे पत्र कुरियरद्वारे पत्र पाठविले. त्यानंतर पीडित महिलेने महिला सुरक्षा शाखेकडेही अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यांतर्गत कलम ४ आणि भारतीय न्यायसंहिता कलम ८५ नुसार विवाहितेला कुरपणे वागविणे, तिचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

SCROLL FOR NEXT