राज्यमंत्रिमंडळाची आज मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे व्यतिरिक्त एकही त्यांचा मंत्री उपस्थित नव्हता. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सारे काही आल बेल नसल्याचे चित्र दिसत होते. अखेर आज शिंदेंच्या मंत्र्यांनी ही खदखद व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला.
शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीची कारणे कोणती?
भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत.
विधानसभेत ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजप आपल्या पक्षात येण्यासाठी ग्रीन कारपेट टाकत आहे.
शिंदेंच्या अनेक नेत्यांना आणि पळकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात, तसेच निधील देखील वळवला जातो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता युतीचा धर्म पाळला जात नाही.
निधी मिळवण्यासाठी शिवसेना शिंदेंच्या मंत्र्यांना मोठी कसरत करावी लागते.
कल्याण - डोंबिवली, संभाजीनगर, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेत शिवसेनेला सुरुंग लावला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.