Sharad Pawar Saam Tv
Video

घरगुती सिलेंडर पुन्हा महागला; दरवाढीवरून शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले...

Sharad Pawar Latest News : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महागाई नियंत्रणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांच्या बजेटवर होणारा परिणाम अधोरेखित केला.

Namdeo Kumbhar

देशात गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. आजही गॅसची दरवाढ झाली असून, सरकारचे महागाई नियंत्रण म्हणजे जनतेला टप्प्याटप्प्याने झटके देणे असेच आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी सरकारला लगावला आहे. एका खाजगी कार्यक्रमासाठी कोल्हापूरला आलेले पवार आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी ते बोलत होते.

गॅस दरवाढ आणि महागाईबद्दल विचारले असता खासदार शरद पवार म्हणाले, इंधन आणि गॅस यांच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. पंतप्रधानांनी आम्ही महागाई नियंत्रणात ठेवल्याचे म्हटले होते; परंतु जनतेला टप्प्याटप्प्याने दरवाढीचे झटके देणे, हेच त्यांचे महागाई नियंत्रणाचे सूत्र असल्याचे दिसत आहे. गॅसच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर आणि प्रपंचावर होतो. याची किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

चमोली बोकद्यामध्ये मोठी दुर्घटना; मातीचा ढिगारा आणि पाणी शिरलं, अनेक कामगार अडकले

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

SCROLL FOR NEXT