Sharad Pawar Special Report Saam TV News
Video

Web EXCLUSIVE: वयाची 80 ओलांडलेल्या पवारांनी 80च्या स्ट्राईक रेटने लोकसभा जिंकली! | Sharad Pawar

Sharad Pawar Special Report: शरद पवार यांनी 80च्या स्ट्राईक रेटने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या 10 जागा जिंकून आणल्य!

Saam TV News

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवारांच्या वाट्याला 10 जागा आल्या.. पण, पवारांच्या पदरी आलेल्या या 10 जागा जिंकण, म्हणजे जवळ-जवळ अशक्यच.. कारण या 10 जागांपैकी 2 जागा केंद्रीय राज्यमंत्र्यांचे बालेकिल्ले.. दिंडोरीतून भारती पवार आणि भिवंडीतून कपिल पाटील.. यांचा पराभव करणं भाजपला मोठा धक्का देण्यासारखंच.. बीडची जागा म्हणजे मुंडें घराण्याचा अभेद्य, अजिंक्य आणि भरभक्कम गड.. 2009 पासून इथं मुंडे घराण्याचं एकहाती वर्चस्व! इथून जिंकणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच.. साताऱ्यात पवारांचा लढा थेट छत्रपतींच्या वारसदारांबरोबर होता.. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.. म्हणजे इथंही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली.. जागावटपात शरद पवारांच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता.. यंदा शरद पवारांचं काही खरं नाही... पवार संपले... असं प्रत्येकालाच वाटतं होतं.. कारण नवीन चिन्ह आणि नाव घेऊन इतक्या कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचणं, त्यांना आपली बाजू पटवून सांगणं.. हे जवळ जवळ अशक्यचं. पण, थांबतील, घाबरतील आणि डगमगतील ते पवार कसले? 84 वर्षांच्या या तरुण योद्ध्याने पायाला भिंगरी लावली. ती नेमकी कशी? तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात, वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Shocking: भयंकर! सोशल मीडियावर फक्त १०० रुपयांत विकले जातात कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ

Spinach Benefits: शिजवलेले पालक आणि कच्चे पालक कोणते आरोग्यासाठी अधिक लाभदायक?तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

myScheme: कोणती सरकारी योजना तुमच्यासाठी? एका क्लिवकवर जाणून घ्या सर्व माहिती

मतमोजणीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, संजय शिरसाट यांचा दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT