भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
विधानसभेच्या निकालानंतर मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणी करणाऱ्या मारकडवाडीला शरद पवारांनी भेट दिली आणि देशाच्या निवडणूक पद्धतीत बदलाची अपेक्षा व्यक्त केली.... यावेळी पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलाय... तर बावनकुळेंनी पवार खोटेपणा करत असल्याचा पलटवार केलाय.
विधानसभेच्या निकालात उत्तम जानकरांना मारकडवाडीतून अपेक्षित लीड न मिळाल्याने ग्रामस्थांनी निकालावर आक्षेप घेत स्वखर्चाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रकरणी प्रशासनाने ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले. त्यावरुन तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी हा कुठला कायदा? असं म्हणत शरद पवारांनी प्रशासनावर हल्लाबोल केलाय. तर फडणवीसांनी मारकडवाडीला भेट देण्याचं आवाहनही पवारांनी केलंय.
ईव्हीएमविरोधातील शंकेच्या ठिणगीला मारकडवाडीच्या निर्णयामुळे हवा मिळाली.त्यातच पवारांनी मारकडवाडीला भेट देऊन वातावरण चांगलंच तापवलंय.. त्यामुळे प्रशासन मारकडवाडीतील ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणी मान्य करणार का? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.