Sharad Pawar and Ajit Pawar share the stage during a public event in Baramati, triggering fresh political speculation. Saam Tv
Video

बारामतीत काका-पुतण्या एकाच व्यासपीठावर; राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Sharad Pawar Ajit Pawar SameStage: बारामतीत शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील युती फिसकल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची सार्वजनिक भेट झाली असून, या भेटीमागे राजकीय संकेत आहेत का, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Omkar Sonawane

बारामतीतून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारी बातमी समोर आली आहे. बारामतीत आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात काका आणि पुतण्या एकाच व्यासपीठावर आलेले दिसत आहेत. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या बाजूला बसले होते आणि त्यांच्यात बराचवेळ चर्चाही झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात युती फिसकटल्यानंतरच्या घडामोडींनंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले आहेत. यापूर्वीच्या राजकीय तणावानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीमुळे आणि संवादांमुळे उपस्थितांमध्ये आणि राजकीय निरीक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. ही भेट केवळ योगायोग आहे की यामागे काही राजकीय संकेत आहेत, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणत्या भाज्या रोजच्या आहारात असाव्यात? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

प्रजासत्ताक दिनी धक्कादायक प्रकार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न|VIDEO

Maharashtra Politics: ऐन ZP निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का; माजी आमदाराने पक्ष सोडला, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

डुप्लिकेट दारू ब्रँडेड कंपनीच्या बाटल्यांमध्ये, लाखोंचा मुद्देमाल जप्त; एक्साईज विभागाची मोठी कारवाई

Moong Dal Halwa Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट मूग डाळ हलवा वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT