Santosh Deshmukh Case Saamtv
Video

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड शरण आला; आता फोकस सुदर्शन घुलेवर, सीआयडीकडून कुटुंबाची चौकशी | VIDEO

Sarpanch Santosh Deshmukh Death Case Update : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपी फरार आहेत. पैकी सीआयडीचा फोकस आता यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. काल वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांचा फोकस या तीन आरोपींवर आहे. दरम्यान या तिघांपैकी सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय सीआयडीला आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपी फरार आहेत. सीआयडीकडून त्यांचा शोध आता सुरू झाला आहे. या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे. सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर आहे. त्याअनुषंगाने सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: ...तर मोफत गॅस सिलिंडर बंद होणार; पीएम उज्जवला योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: सांगली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेत्यांची बंद दार आड चर्चा

Ruchak Yog: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार रूचक राजयोग; या राशींचं नशीब रातोरात पलटणार

Tata Sierra Booking Date: टाटाच्या नव्या SUV मॉडेलची किंमत आली समोर, बुकिंग डेट झाली फिक्स, वाचा फिचर्स

Castor Oil Benefits For Skin: सुंदर अन् मऊ त्वचेसाठी लावा एरंडेल तेल, आठवडाभरातच दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT