Minister Sanjay Shirsat joking about his money bag during Ganeshotsav program in Sambhajinagar Saam Tv
Video

Sanjay Shirsat: भर कार्यक्रमात संजय शिरसाट म्हणाले... तर माझी पैशाची बॅग उघडीच आहे|VIDEO

Sanjay Shirsat Money Bag Remark: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी बंदीच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये बँड-बँजो मागवण्याचे आवाहन केले. यावेळी “पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे” असे मिश्किल वक्तव्य करत त्यांनी हशा पिकवला.

Omkar Sonawane

संजय शिरसाट यांनी डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर बँड-बँजो मागवण्याचं आवाहन केलं.

मिश्किल टिप्पणी करत त्यांनी पैशांची बॅग उघडी असल्याचं म्हटलं.

याआधी त्यांचा पैशांनी भरलेली बॅग दिसणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

वक्तव्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सावत डीजे, डॉल्बी वाजवण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना डीजेएवजी बँड, बँजो मागवा असे आवाहन केले. यावेळी संजय शिरसाट यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे. तुम्ही बाहेरून बँड, बँजो मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे असे संजय शिरसाट म्हणाले. काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसले असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांच्या खोलीत पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसली होती. या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील कार्यक्रमात हे भाष्य केले आणि त्यानंतर एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sawantwadi : सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव बदलले, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता नवं नाव काय?

hotel food cost increase : इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका! खाद्यपदार्थांच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या, VIDEO

Maharashtra News Live Update: बीड - गेवराईमध्ये घर जळून खाक, कुटुंब देवदर्शनाला गेल्याने जीवितहानी टळली

ना जीम, ना डाएट; फक्त 7 दिवस प्या 'सब्जा आणि तेजपत्ता' ड्रिंक, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर; हक्काचा माणूस गमावला

SCROLL FOR NEXT