Sanjay Raut launches scathing attack on Devendra Fadnavis over India-Pakistan cricket row Saam Tv
Video

फडणवीसांवर राऊतांचा घणाघात; त्यांच्या आणि भाजपच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे Xगडे दिसाल,|VIDEO

Devendra Fadnavis vs Sanjay Raut: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या भूमिकेवरुन राज्याचे राजकारण तापले आहे.

Omkar Sonawane

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन राज्याचे राजकारण तापले.

संजय राऊत यांनी फडणवीसांवर “गुडघ्यात मेंदू नाही” असा जोरदार हल्लाबोल केला.

राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांची ठाम भूमिका फडणवीसांना दाखवून दिली.

ठाकरे गटाचा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामन्यास ठाम विरोध.

भारत आणि पाकिस्तान सामन्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानी विरोधात क्रिकेट खेळण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार विरोध सुरू आहे. यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून दिल्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस अर्धवट ज्ञानी असून त्यांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही, भाजपवाल्यांना सुद्धा मेंदू नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी पलटवार केला. संजय राऊत म्हणाले, फडणवीसांनी ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे.

ठाकरेंच्या तेव्हाच्या मुलाखती देखील समजून घेतल्या पाहिजेत. जावेद मियाँदाद मातोश्रीवर बाळासाहेबांना भारत-पाकिस्तानला क्रिकेटला विरोध करू नका हे सांगण्यासाठी आला होता. मात्र बाळासाहेबांनी त्यांना चहा घ्या आणि निघून जा, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही अशा शब्दात त्यांनी सांगितले होते. मात्र मिस्टर फडणवीस मोदींप्रमाणे बाळासाहेबांनी शेपूट घातली नव्हती. जर तुम्हाला सिंदूरची कदर असेल तर अशी विधाने करणार नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला. ते म्हणाले की तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे Xगडे दिसाल. तुम्ही फक्त इतकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशांसाठी तुम्ही पकड्यांसमोर शेपूट घातली असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी फडणवीसांवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT