Sanjay Raut addresses media, confirming Manse and Thackeray factions’ alliance ahead of municipal elections. Saam Tv
Video

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Sanjay Raut On Manse ShivSena Alliance: संजय राऊत यांनी स्पष्ट केले की मनसे आणि ठाकरे गट यांची युती झाली आहे. मुंबईसह इतर पालिकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र काम सुरू केले आहे. फक्त जागा वाटपाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. महपालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र लढत असून दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. फक्त जागा वाटपांचा तिढा आहे. तसेच अधिकृत घोषणेसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल असे विचारले असताना संजय राऊत म्हणाले, कशाला वाट पहायची, कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे.

मनसे आणि शिवसेनेच्या युतीत कोणताही संभ्रम नाही. मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्ते सोबत काम करायला सुरुवात झाली, तशा सूचना गेल्या आहेत. ही युती झाली आहे. फक्त जागावाटवपर काल रात्री शेवटची भेट झाली. राज, उद्धव ठाकरे एकत्र येऊन फक्त घोषणा करायची बाकी, ते आज करायची की उद्या ठरवतोय. नाशिकमध्ये चर्चा आटोपली, पुणे, ठाणे, मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे. थोड्या वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी बोलून ठरवू. माणसाने बोलले पाहिजे, नंतर वाटते बोलायचं राहून गेलो ही राष्ट्रीय समस्या आहे. सर्व संविधानिक संस्था भाजपच्या पायाखाली चिरडल्या जातील, त्यामुळे नंतर असे वाटायला नको की बोलायचं राहून गेलो. असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील, विधानसभेच्या माजी उपाध्यक्षांचा दावा|VIDEO

मॉडेल समुद्राच्या किनार्‍यावर देत होती पोझ, अचानक लाट आली अन्... VIDEO व्हायरल

Glowing skin: पिंपल फुटल्याने चेहऱ्यावर खड्डे पडलेत? या घरगुती उपायांनी मिळेल सॉफ्ट आणि ग्लोईंग त्वचा

Akola : "नवरदेव तयार आहे, पण..." प्रकाश आंबेडकरांच युतीबाबत मोठं विधान!

SCROLL FOR NEXT